जळगाव जामोद तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायतींचा सरपंच आणि सदस्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सरपंच आणि सदस्यपदासाठी अनेक उमेदवार रिंगणात आहेत. सध्या उमेदवार गावातील गल्ली अन् गल्ली फिरत असून, तर ताई, बाई, अक्का, विचार करा पक्का अशा प्रचार ग्रामीण भागात सध्या सुरू आहे..
रिंगणात उतरलेले उमेदवार समर्थक, विरोधक मतदारांच्या हालचालीवर विशेष लक्ष ठेवून असल्याने वाद होण्याच्या धास्तीने गावातील वातावरण ढवळून निघाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला अवघे सहा दिवस उरले आहेत. गावागावांतील स्थानिक व पक्षीय राजकारणाला अधिकच पेव फुटले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक चिन्ह वाटपापासूनच निवडणुकीला खऱ्या अर्थानि रंगत येऊ लागली होती. लहान गावात दोन ते मोठ्या गावांमध्ये गावात तीन ते चार पॅनल एकमेकांविरुद्ध दंड थोपटून आहेत. दिवसभर शेतशिवारात कामात व्यस्त असलेले मतदार सायंकाळी गावात परतताच उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी होत आहे. भाऊ लक्ष असू द्या' आपल्या समस्या निकाली काढू, एवढेच नव्हे तर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन समस्या सोडवू अशी अनेक आश्वासनांची खैरात दिली जात आहे.

.jpeg)