मोताळा तालुक्यातील कुऱ्हा गोतमारा या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे . या रस्त्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे . कुऱ्हा गोतमारा हा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी धामणगाव बढे सह परिसरातील वाहन धारकां सह नागरिकांकडून होत आहे. कुऱ्हा गोतमारा ह्या रस्त्यावर अनेक वर्षांपासून या मार्गा ची खराब अवस्था असल्याने ये - जा करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे . हा मार्ग विदर्भ ते मराठवाड्यातील जोडणारा मार्ग आहे अनेक् गावा पासून हा मार्ग अत्यंत खराब झाल्याने या रस्त्याने वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे . कुऱ्हा ते गोतमारा रस्त्यावर चालविताना किरकोळ वाहन अपघाताच्या घटनाही घडत आहेत . यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे . या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी वारंवार नागरिकां कडून होत आहे .
