धरणगाव : शेती घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या विरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विवाहिता मनीषा रवींद्र काकडे (वय ३५, रा. वंजारी खपाट ता.धरणगाव) यांचा दि. ३१ डिसेंबर, २०१४ पासून ते २४ डिसेंबर २०२२ च्या दरम्यान माहेरहून शेतीसाठी २ लाख रुपये आणावे, म्हणून छळ सुरू होता.
सासू इंदुबाई लोटन काकडे व पती रवींद्र लोटन काकडे यांनी विवाहितेला वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देत मारहाण केली. या प्रकरणी मनीषा काकडे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात सासू इंदुबाई काकडे व पती रवींद्र काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.ना. राजू पाटील हे करीतआहेत.

.jpg)