महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस संघात जिल्ह्यातील तीन खेळाडूंची निवड

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


मलकापूर  १७ वी ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य संघात बुलढाणा जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या खेळाडुंची निवड झाली आहे. सदर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा ९ ते १३ डिसेंबर दरम्यान विजयानगर स्पोर्ट्स अकॅडमी लखनऊ येथे संपन्न होणार आहे. २५ ते २७ नोव्हेंबर सातारा येथे संपन्न झालेल्या ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या नेत्रदीपक कामगिरी करीत क्रीडा क्षेत्राचे हब असलेल्या मलकापूर शहरातील खेळाडूं व सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणाचे खेळाडू कु. विनिता खेडद, कु.भक्ती साळुंखे व कुणाल पळसकर या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झालेली आहे.

सदर खेळाडूंनी बुलडाणा जिल्हाचा नावलौकिक महाराष्ट्रतात वाढविला असून सदर सर्व खेळाडूंना विजय पळसकर क्रिडा संघतक व मार्गदर्शक सचिव सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशन बुलढाणा यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभत आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)