नशिराबाद शिवारातून गायीची चोरी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


जळगाव: नशिराबाद शिवारातील एका शेतातून ३० हजार रुपये किमतीची गाय चोरट्याने लांबविल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी बुधवारी नशिराबाद पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे. नशिराबाद येथील रहिवासी ज्ञानदेव विठ्ठल लोखंडे यांनी त्यांच्या मालकीची गाय नशिराबाद शिवारातील त्यांच्या शेतात बांधली होती. मंगळवारी मध्यरात्री चोरट्याने ती गाय चोरून नेली. बुधवारी सकाळी ८ वाजता शेतात आल्यावर त्यांना गा दिसून आली नाही. गाय चोरीला गेल्याची खात्री झाली. शेवटी त्यांनी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल केला. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून पशुधन चोरणारी टोळी सक्रिय झाली असून, दोन किंव तीन दिवसाआड पशुधन चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत.

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)