नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील अल्पसंख्यांक घरकुलाकरिता ग्रामपंचायत वडनेर भोलजी ला प्रधानमंत्री घरकुल योजने करिता, उद्दिष्ट द्या. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता उद्दिष्ट मिळाले परंतु अल्पसंख्यांक लाभार्थ्यांकरिता आज पावतो उद्दिष्ट मिळाले नाहि याकरिता ग्रामपंचायत स्तरावर संबंधितांकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली परंतु काहीच फायदा झालेला दिसत नाही यामुळे अल्पसंख्यांक समाजात संभ्रम निर्माण झालेला असून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्याचे ठरले आहे अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच अब्दुल बासिद् जमादार यांनी मुलाखतीत सांगितले. त्यावेळेस ग्रामपंचायत सरपंच पती संतोष भाऊ दिघे ग्राम विकास अधिकारी श्री जी आर ठाकरे, देविदास वाघ निलेश वाघ संतोष जुमडे सुनील जुमडे सरजू गुहे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
