नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेला एकूण १७ शिक्षकांची जागा आहे त्यातून फक्त ,९ शिक्षक कार्यरत असून आठ पदे रिक्त आहेत याकरिता शाळा व्यवस्थापन समितीच्या विनंती तथा मागणीवरून ग्रामपंचायत सरपंच संतोष भाऊ दिघे उपसरपंच अजमत बेग मिर्झा ग्रामपंचायत सदस्य मुनशीफखान, सय्यद उस्मान, अब्दुल बासित जमादार, शेख करीम ,या सर्व मान्यवरांनी त्यांचे तर्फे प्रत्येक महिन्याला एका शिक्षकाला ५००० रुपये मानधन प्रमाणे शिक्षक नियुक्ती करण्याकरिता मान्यता दिली असून शाळा व्यवस्थापन समितीने वडनेर गावातील पदवीधर शिक्षक नेमणूक करून पाच डिसेंबर पासून सदर नेमणूक केलेल्या शिक्षकांना कामावर रुजू करण्याचे योजले आहे. याबाबत वडनेर ग्रामपंचायत प्रशासनाचे गावकरी नागरिकांकडून खूप कौतुकास्पद प्रशंसा होत असून बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील ग्रामपंचायत मार्फत हे प्रथम कार्य हाती घेतले आहे, तरी शिक्षण विभागाने तात्काळ सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून तात्काळ सदर शाळेला शिक्षक नेमणूक करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे असे सुद्धा गावकरी नागरिकांकडून ऐकण्यास मिळत. आहे.
