चिखली शहरातील बाजार पेठेमध्ये मिळेल त्या परिस्थितीत, थंडी, ऊन, पावसाची पर्वा न करता, बसून लहान व्यावसायिक जीवनावश्यक वस्तू विकून आपल्या आयुष्याचा गाडा चालवितात. त्यांचे कुटुंब, लहान मुलांचे शिक्षण असो वा आरोग्याचा खर्च या सर्व बाबींची पूर्तता या व्यवसायाच्या माध्यमातून ते पूर्ण करतात.
चिखली न.प. प्रशासनाने राजरोस पणे लहान व्यवसायिकांच्या स्वप्नांवर हातोडा चालविण्याचे काम सुरू केले आहे. व सर्व लहान व्यावसायिकांना नोटीस देत बजावले आहे. आता सर्व कुटुंबावर उपासमारीची वेळ या सरकारने आणल्यामुळे त्यांच्या न्यायहक्कांसाठी व मागण्यासाठी चिखली काँग्रेसच्या वतीने सर्व कष्टकरी, व्यावसायिक, व मजूर बांधवांच्या उपस्थितीत धडक मोर्चा काढून न.प प्रशासनाला निवेदन दिले.
लवकरात, लवकर सामान्य गरीब व्यवसायिकांच्या मागण्या सरकारने, प्रशासनाने मान्य करून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करावी तसेच त्यांना दिलेल्या नोटीसा मागे घेण्यात याव्या या मागण्यांसह हजारो लोकांच्या उपस्थितीत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा काँग्रेस, तालुका काँग्रेस, चिखली शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, व सर्वच सेलचे पदाधिकारी, सहकारी, व कार्यकर्ते हे उपस्थित होते.
