मलकापूर-भाजपा नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून मंत्री पदावरून हकालपट्टी करून मनोरुग्णयात दाखल करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन आज १२ डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने गृहमंत्री यांचेकडे तहसीलदार मलकापूर यांच्यामार्फत पाठविण्यात आले.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपा नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ डिसेंबर रोजीरोजी पैठण येथे आयोजीत कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांकडे भीख मांगून शाळा सुरु केल्या असे वादग्रस्त विधान करुन या महापुरुषाचा अपमान केला. त्यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जावून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात सुव्यवस्था बिघडवणारे भाजपा नेते मनोरुग्ण आहे. त्यामुळे त्यांना नागपूर येथील मनोरुग्णलयात दाखल करण्यात यावे व मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. तसेच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध नोंदविणारे पुणे येथील पिंप्रीचिंचवडच्या आंबेडकरी चळवळीतील तरुणांवर राजकीय सत्तेचा दुरुपयोग करुन ३०७ आणि कलम ३५३ नुसार मनोज भास्कर घरबडे, धनंजय भाऊसाहेब इजगज, विजय धर्मा ओव्हळ या युवकांवरील दाखल केलेले गंभीर गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे. तसेच पिंप्रीचिंचवड मधील घटनेला पूर्णपणे भाजपा नेते जबाबदार आहे. असे असतांना सुध्दा सदर घटनेसाठी पोलीस कर्मचार्‍यांना दोषी ठरवत ११ कर्मचारी निलंबीत केले. त्यांचे निलंबन त्वरीत मागे घेण्यात वावे. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जो निषेध नोंदविला त्या निषेधचा व्हि.डी.ओ आणि बातमी बनवून पत्रकार गोविंद वाकडे आंदोलकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्या पत्रकारावर सुध्दा राजकीय द्वेषातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मागे घेण्यात यावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुकाच्या वतिने लोकशाहीमार्गाने आक्रमक स्वरुपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
निवेदनावर 
अतिश भाई खराटे जिल्हा महासचिव, विलास तायडे तालुका उपाध्यक्ष, यशवत कळासे जिल्हा उपाध्यक्ष, प्रविण इंगळे तालुका सदस्य, तुळशीराम वाघ जि.सचीव, भाऊराव उमाळे जि. संघटक, विजय वानखेडे, शांताराम सोनोने, प्रकाश थाटे,  शिवसिंग हळदे, सौ. रेखाताई राजाराम नितोने, कौशल्याबाई राजाराम वानखेड, राजाराम नितोने, सुखदेव तायडे, आर.एम.सुर्यवंशी, के.यु.बावस्कर, पी.डी.वाकोडे, शाहीर उदेभान इंगळे, मधुकर इंगळे, सुनिल इंगळे, अनिल तायडे यासह आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)