तब्बल ११८ पोलिसांना मिळाली पदोन्नती!

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 

पदोन्नती मिळालेल्या पोलिसांसोबत पोलिस अधीक्षक एम. राजकुमार.


         जळगाव जिल्हा पोलिस दलातील ११८ पोलिस कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार पदोन्नतीची भेट दिली. त्यामध्ये ७२ सहायक पोलिस दिली. उपनिरीक्षक यांना थेट ग्रेड पोलिस उपनिरीक्षक पदावर तर १२ पोलिस हवालदार यांना सहायक पोलिस उपनिरीक्षक पदी व ३४ पोलिस नाईक यांना हवालदार पदावर पदोन्नती मिळाली आहे. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी वर्षाच्या शेवटी जळगाव जिल्हा पोलिस दलाचे आस्थापनेवरील पोलिस दलात ३० वर्षे सेवा आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर ३ वर्षे सेवा करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पदावरील वेतनश्रेणीतील वेतन घेत असलेल्या ७२ सहायक पोलीस उपनिरीक्षक यांना ग्रेड पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची भेट त्यासोबत सेवा ज्येष्ठतेनुसार १२ पोलिस हवालदार यांना सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर व ३४ पोलिस नाईक यांना पोलिस हवालदार पदावर पदोन्नती दिली आहे. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पोलिस अधीक्षक दालनात पदोन्नती बहाल करून फीत स्टार लावून शुभेच्छा दिल्या.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)