जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड यांचे हस्ते सहायक पोलीस उपनिरीक्षक माधव पेटकर यांना उत्कृष्ट कामा बाबत प्रशस्तीपत्र देवुन सन्मनीत

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

धामणगांव बढे प्रतिनिधी सादिक शेख

    बुलढाणा शहर पो.स्टे . ला कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधव पेटकर यांनी दी . ८/१२/२०२२ रोजी गु . र . नं ९ ७० / २०२२ कलम ४५४ , ४५७ , ३८० भा . द . वी . प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास सपोउपनि माधव पेटकर यांनी सदर | अज्ञात आरोपींची कौशल्य पुर्ण व अत्यंत गोपनीय चातुर्याने माहीती मिळवुन भौतिक व तांत्रिक पुराव्याचे आधारे एकुण ३ आरोपी निष्पन्न करुन त्यांचे कडुन या गुन्ह्या वितिरिक्त एकुण ८ गुन्ह्यांची  उकल करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केल्याची कौतुकास्पद कामगीरीकरुन  पोलीस प्रशासनाची प्रतिमा व जनसामान्य नागरिकांचा विश्वास संपादीत केला . 
    पोलीस प्रशासनातील या उत्कृष्ट व चातुर्यपणे प्रशंसनीय केलेल्या कामगीरीची दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड यांनी त्यांचे स्वहस्ते स.पो. उपनी माधव पेटकर यांना प्रशस्तीपत्र देवुन सन्मानीत केले . या प्रसंगी सपोउपनी माधव पेटकर यांच्या उत्कृष्ट व प्रशंसनीय कार्याची वरिष्ठांनी दखल घेत प्रशस्तीपत्र देवुन सन्मानीत केल्याने पोलीस प्रशासनातील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्यात उत्सुकता वाढली आहे .

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)