सायगावच्या शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


 सायगाव, ता. चाळीसगाव : प्रगतिशील शेतकरी विवेक विश्वासराव सोनवणे (५४) हे बिलाखेडजवळ झालेल्या अपघातात ठार झाले.विवेक सोनवणे हे भाच्याच्या सासऱ्याकडे कार्यक्रमासाठी गेले होते. रविवारी संध्याकाळी ते चाळीसगाव येथे जाण्यासाठी बुलेट मोटारसायकलने निघाले होते. कार्यक्रमानंतर ते रात्री सायगाव येथे परत येण्यासाठी निघाले. बिलाखेडजवळ उसाचा भरलेला ट्रॅक्टर उभा होता. त्या ट्रॅक्टरच्या भरलेल्या ट्रॉलीला त्यांच्या बुलेटने मागून धडकदिली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

ही घटना रात्री ११:३० ते १२ वाजेदरम्यान घडली. रात्री पोलिस अधिकारी चाळीसगाव मालेगाव रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले. त्यांनी विवेक पाटील यांच्या खिशाची तपासणी केली असता त्यांना सोनवणे यांच्याकडे आधारकार्ड मिळाले. त्यांनी लगेच चाळीसगाव येथे संपर्क साधला. आरोग्य कर्मचारी विकास जयंतराव सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विवेक पाटील यांना ओळखले. तेथे जि. प. सदस्य भूषण सोनवणेदेखील दाखल झाले होते. सोनवणे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, पाच बहिणी, असा परिवार आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)