प्रतिनिधी मुक्ताईनगर
सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अनिल देवकर हिंदू एकता आंदोलन पक्ष जिल्हाध्यक्ष यांनी दिनांक 29 12 2022 रोजी उपोषण सुरू केलेले असून संबंधित अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असून त्यांना साधी भेट द्यायला तयार नाही आहे त्यांनी केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे. बोदवड तालुक्यातील जामठी येथील गट क्रमांक खाजगी 51 आणि गट क्रमांक 52 जिल्हा परिषद यांच्या व गट क्रमांक 50 53 खाजगी शेतमालकाची संमती न घेता अवैध्य झाडांची कत्तल झालेली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी ते उपोषणाला बसलेले असून त्यांचा आज उपोषणाला पाचवा दिवस असून कोणताही अधिकारी त्यांची साधी भेट घ्यायला तयार नाही त्यामुळे प्रशासन अशा अधिकाऱ्यांना पाठीची तर घालत नाही ना असा संशय निर्माण होत आहे

