दि .न्यु ईरा हायस्कूल चे प्राचार्य .अविनाश कुलकर्णी यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


जळगाव जा

        जळगाव जामोद शहरातील नामांकित हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांची सण 2021-22 या वर्षाच्या राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्य शासनाने दिनांक 29 डिसेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे राज्यस्तरीय शिक्षक गुण गौरव पुरस्काराची निवड यादी जाहीर झाली असून त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नामांकित जळगाव जामोद येथील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी सर यांचे नाव असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक गुण गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
         इंग्रजी विषयाच्या अध्यापनात निपुण असलेले व इंग्रजी विषयाच्या राज्यस्तरीय विविध अभ्यास गटांमध्ये कार्यरत प्राचार्य अविनाश कुळकर्णी यांना यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.. यावेळी जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल व सचिव अनुप पुराणीक यांनी प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)