साता समुद्रापार मराठी शिकविणारी मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल**मराठी संवर्धनाचा घेतला वसा*

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

नाशिक प्रतिनिधी 

विश्वातील विकसित भाषापैकी ज्ञानसंपन्न, समृद्ध अशी भाषा म्हणजे मराठी ही होय. मराठी भाषेचे स्थान व दर्जा अभिजात व राजभाषा म्हणूनच आहे. वैश्विक स्तरावर मराठी पोहचवण्यासाठी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक या संस्थेच्या संस्थापक प्रकाश कोल्हे आणि सचिव ज्योती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या मराठी वैश्विक शाळेची स्थापना झाली.तर या शाळेच्या प्रमुख म्हणून डॉ.किर्ती वर्मा या कार्य बघतात. 
      संत ज्ञानेश्वरांनी माय मराठीचे कौतुक केले आहे.अमृतातेहि पैजासी जिंकणारी मराठी राजभाषा अभिजात भाषा होती, आहे व असणार यात मुळीच शंका नाही; याकरिता हा वैश्विक स्तरावरती एक अभिनव उपक्रम दि. ११-१-२०२१ रोजी भारताच्या माजी राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल चे उदघाटन झाले व सुरू झाली मराठी चे अटके पार झेंडे लावण्याची तयारी ...आनंदाची गोष्ट म्हणजे या शाळेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात अटलांटा, अमेरिका, लंदन, नीदरलैंड, ऑस्ट्रिया इ. विविध देशातून विद्यार्थी जोडल्या गेले व त्यांनी माय मराठी आत्मसात केली सुद्धा....आज परदेशात स्थायिक झालेली ही मुले भारतातील आपल्या आजी - आजोबा व कुटुंबीयांसोबत मराठी तून बोलत आहे, मराठी कथा, कविता वाचत आहे, मराठी लिहण्याचा प्रयत्न करत आहे. या पहिल्या मराठी वैश्विक शाळेचा प्रथम वर्धापन दिन मागच्या वर्षी महात्मा गांधी यांचे पणतू मा. तुषार गांधी यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला होता. 
        मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होत असतांना या वर्षी ग्लोबल लँग्वेज स्कूल या प्रथम वैश्विक मराठी शाळेच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमासाठी मा. श्री. लक्ष्मीकांत देशमुख,  माजी संमेलनाध्यक्ष ९१ वे अ. भा. सा. सम्मेलन बडोदा हे ऑनलाइन पद्धतीने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)