धामणगाव बढे येथे बस स्थानकावर नविन प्रवासी निवारा आणि मुत्रीची बनविण्याची मांगणी**महिला व पुरुषासाठी प्रवासी निवारा आणि लघुशंखेसाठी मुतारी ची समस्या कायम* *प्रशासनाला लक्ष देण्याची गरज

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

धामणगांव बढे प्रतिनिधी सादिक शेख

येथील आठ ते दहा महिन्यापासून रोड रुंदीकरण चे काम चालू असताना मुत्री तोडण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत रोडचे काम पूर्णपणे होऊन चार महिने झाले तरीसुद्धा प्रवाशासाठी प्रवासी निवारा व मुत्री चे बांधकाम करण्यात आलेले नाही तरी धामणगाव बढे बसस्थानकावर प्रवासी निवारा व मुतारी ची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे विशेष महिलांसाठी लघुशंकेसाठी कोणतीही जागा उपलब्ध नाही कारण रस्ता रुंदीकरण झाल्यावर  आजूबाजूला सर्व अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने टपऱ्या थाटल्या आहेत अशा परिस्थितीत महिलांना लघुसंखेसाठी कानाकोपरा पहावा लागत आहे कोपऱ्यात गेल्यावर इकडे माणसे उभे तिकडे माणसं उभे अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढावत आहे माणूस तरी कुठे जाऊन सुद्धा लघु शंका करू शकतो परंतु महिलांनी कुठे जावे ही समस्या फार गंभीर आहे अशा परिस्थितीत ग्रामपंचायत आणी संबंधित प्रशासन यांचा गलथान कारभार दिसून येत आहे तरी ग्रामपंचायत किंवा संबंधित प्रशासन यांनी लवकरात लवकर प्रवासी निवारा व लघुशंकेसाठी महिला व पुरुषांसाठी मुत्री घराची व्यवस्था करावी व महिला प्रवासी यांची समस्या जास्त गंभीर असल्यामुळे त्वरित निर्णय घ्यावा अशी धामणगाव बढे नागरिकांची व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची कडुन मागणी होत आहे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)