नांदुरा तालुक्यातील १० वी १२ वी मध्ये ८५%चे वर गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


प्रतिनिधी नांदुरा,

        नांदुरा शहर व ग्रामीण मधील वर्ग १० व १२ वी मधे ८५% पेक्षा जास्त मार्क असलेल्या सर्व विद्यार्थी/विद्यार्थिनींचा गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन  मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड , मॉ.जिजाऊ सावित्री विचार मंच व मराठा पाटील युवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्याचे ठरले असून हा कार्यक्रम येत्या २६ जून २०२३ सोमवार रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून आयोजित केला आहे.यामधे इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेत ८५% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधत २६ जून २०२३ सोमवार  रोजी  नांदुरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह(नगर परिषद टाऊन हॉल)येथे  करण्यात येणार आहे. तरी वरील पात्र विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, निवासी पत्ता व संपर्क क्रमांक खालील पत्त्यावर जमा करावा असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव शिवश्री सचिन तायडे साहेब यांनी  केले आहे. तसेच आता पुढे काय करावं अस प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर असतो.करिता याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांना १० वी व १२ वी नंतर असलेल्या संधी याबाबतचे नामांकित वक्त्याचे मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित केलेले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी सदर व्याख्यानाच्या सुद्धा लाभ घ्यायचा आहे

                                        गुणपत्रिका जमा करण्यासाठी पत्ता 

1) स्वराज ऑप्टिकल मलकापूर रोड नवीन बस स्थानक जवळ नांदुरा

2) भक्ती मेडिकल,डॉ.गव्हाळ यांच्या दवाखण्या बाजूला बुलढाणा रोड नांदुरा


जर काही विद्यार्थी किंवा पालकांना स्वतः येऊन गुणपत्रिका देणे शक्य नसल्यास त्यांनी गुणपत्रिका, निवासी पत्ता व मोबाईल क्र. ई. खालील नंबर वर Whatapp करावे अमर रमेश पाटील 9595086366 , अशोकराव धनोकार9763055071 , कपिल पाटील9730505806 , विजय अढाव 97650 51650

गुणगौरव सोहळ्याचे ठिकाण :- छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (न. प.टाऊन हॉल)छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ नांदुरावेळ:- सकाळी १० वाजतादिनांक:- २६ जून २०२३ टीप:- कार्यक्रमानंतर लगेच स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली आहे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)