बुलढाणा जिल्ह्यात रविकांतभाऊंच्या आंदोलनामुळे आतापर्यंत २ लाख ४४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर २२८.८७ कोटी रुपये जमा झाले आहे.
पण कंपनीने उशिरा तक्रारी केल्याच्या नावाखाली ११ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना अपात्र केले आहे. त्या शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्यासंदर्भात रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत, केलेल्या सविस्तर चर्चेनंतर कंपनीने 'त्या' शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे मान्य केले आहे.
त्रुटीमध्ये असलेल्या १४०० शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा मिळण्यासंदर्भात आज कृषि विभागाने पुन्हा एक कंपनीकडे अहवाल पाठविला आहे.
ज्या शेतकऱ्यांना १००० रु. पेक्षा कमी पैसे आले त्यांना तातडीने वाढीव मोबदला मिळावा व ज्या शेतकऱ्यांना कमी पैसे आले त्यासंदर्भातचा तफावत अहवाल तातडीने तालुका/ जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक घेवून तयार करून त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी मा.रविकांतभाऊ तुपकर यांनी लावून धरली. त्यासंदर्भात अहवाल तयार करण्याचे काम कृषि विभागाने चालू केले आहे. या विषयावर जोपर्यंत शेतकऱ्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत आपला लढा चालूच राहील, असे रविकांतभाऊंनी स्पष्ट केले आहे.
