मतदार नाव नोंदणी अभियानात सहभागी व्हा तहसीलदार सुरडकर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


मलकापूर

दिनांक ०१/०१/२०२४ रोजी जे मतदार वयाचे १८ वर्षे पूर्ण करणार असतील त्यांनी मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करीता आवश्यक पुराव्यासह नमुना ६ चा अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे दयावे किंवा ऑनलाईन पध्दतीने www.nvsp.in या वेबसाईट वर किंवा Voter Helpline या अॅपच्या माध्यमातून आपले नांवाची मतदान नोंदणी करण्यात यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी मनोज देशमुख व तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी राजेश सुरडकर २१ मलकापूर विधानसभा मतदार संघ यांनी केले आहे. निवडणूक आयोगाने दिनांक ०१/०१/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला असून या कार्यक्रमाअंतर्गत २० जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे ऑनलाईन मतदार नोंदणीबाबत नविन सॉफ्टवेअर हाताळण्याचे प्रशिक्षण त्यांना दयावयाचे आहे.

 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जावून मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे. यावेळी मतदारांनी मतदार यादीतील आपले नांव व फोटो व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यावी. मतदारांचे अस्पष्ट / खराब फोटो बदलणे मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण ही कार्यवाही २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे. ०१/०१/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादयांचे पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत नांव समाविष्ट / वगळणी करण्यासाठी प्राप्त अर्ज निकाली काढण्यात येवून दिनांक ३० सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत प्रारूप मतदार यादी तयार करण्यात येणार आहे.


०१/०१/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादयांचे पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप मतदार यादी १० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून याबाबत आक्षेप / हरकती दाखल करण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. प्राप्त दावे / हरकती २६ डिसेंबर २०२३ पर्यंत निकाली काढावयाचे आहेत. अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी ५ जानेवारी २०२४ रोजी संबंधित मतदान केंद्रावर करण्यात येणार आहे.

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)