माहिती अधिकार कायद्या अंतर्गत माहिती मागणाऱ्या आरोपी महासेन सुरडकर व रवींद्र काशिनाथ साठे यांची शासकीय कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणातून निर्दोष मुक्तता

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापुर (06-07-2023)
प्रकरणाची हकीकत अशी आहे की, नांदुरा येथील पंचायत समिती अंतर्गत कार्यरत शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी नांदुरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होती की, बोदवड जिल्हा जळगांव येथील रहिवाशी महासेन सुरडकर यांनी व रवींद्र साठे रा. बेलाड ता. मलकापूर यांनी नांदुरा पंचायत समिती येथे माहिती अधिकार अंतर्गत अर्ज दाखल करून नांदुरा तालुक्यातील 105 शाळांची माहिती मागितली होती ती माहिती देण्यास नकार दिला असता महासेन राजाराम सुरडकर व रवींद्र काशिनाथ साठे यांनी त्याला पंचायत समिती नांदुरा चे आवारात तत्कालीन पंचायत सभापती अनिल इंगळे व उपसभापती पती संतोष डिवरे यांच्या समक्ष लोटपाट करुन धक्काबुक्की करून तारीख 16/1/2015 रोजी शासकीय कामात अडथळा निर्माण केला व पाहून घेण्याची धमकी दिली,अशी फिर्याद दाखल केली.त्या फिर्यादी वरून नांदुरा पोलीस स्टेशन येथे भा. द. वी. चे कलम 353 व इतर सह कलमांन अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मलकापूर येथील न्यायालयातसदर प्रकरण वर्ग केल्यानंतर सदर प्रकरण सेशन खटला नं 57/2018 नुसार नोंदवून सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे झालेले सर्व साक्षपुरावे तपासल्यानंतर मलकापूर येथील अति जिल्हा न्यायाधीश श्री एस व्ही जाधव साहेब यांनी आरोपी तर्फे ॲड. जी. डी.पाटील यांनी मांडलेला बचाव मान्य करून सदर प्रकरणातुन आरोपी महासेन सुरडकर व रवींद्र साठे यांची निर्दोष मुक्तता केली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)