
प्रतिनिधी । वरणगांव
शहरातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांच्या चारचाकी वाहनाच्या मागील बाजूचे काच अज्ञाताने फोडल्याची घटना घडली.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीसांनी अज्ञाताचा शोध कार्यास सुरुवात केली आहे.
शहराच्या प्रतिभानगर मधील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. विनोद चौधरी यांनी आपल्या मालकीची एम.एच. १९ / सी.व्ही. ८५९० ची कार आई हॉस्पीटल समोर दि. १९ जुलै रोजी उभी केली होती. मात्र, मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री या कारचा मागील काच फोडल्याची घटना सकाळी उघडकीस आली. यामुळे डॉ. विनोद चौधरी यांनी याबाबत पोलीसांना माहीती दिल्याने एपीआय आशिषकुमार आडसुळ व सहकाऱ्यांनी घटना स्थळाची पाहणी करून माहिती घेतली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्याचा आधार घेत अज्ञाताचा शोध सुरु केला आहे.
काच फोडल्याची पहीलीच घटना
शहरातील हॉस्पीटल समोर लावण्यात आलेल्या कारचे काच फोडल्याची घटना प्रथमच घडली.तर नुकतेच शहरातीलच डॉ. बेंडाळे यांच्या हॉस्पीटल समोरून दुचाकीवर लावलेली १ लाख ३५ हजार रुपयांची बॅग भामट्याने लांबवली असून हि घटना सीसी टिव्ही कॅमेर्यात चित्रबद्ध झाली आहे . या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांच्या तपासाला लागले आहेत.