मुक्ताईनगरात बूथ स्तरावर जनसंपर्क अभियान

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी 

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 9 वर्ष पूर्ती बद्दल महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस,आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे तथा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 9 वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची हा अजेंडा घेऊन देशात पुन्हा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना प्रधानमंत्री करण्याच्या अनुषंगाने महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे.त्याच अनुषंगाने मुक्ताईनगर तालुक्यातील 141 बूथ वर मेरा बूथ सबसे मजबूत या संकल्पनेतून बूथ संपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली.दरम्यान 141 बूथ पैकी 48 बूथ वर प्रत्यक्ष जाऊन बूथ प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख यांना सोबत घेऊन बूथ बैठक घेण्यात आली सदर बूथ बैठकीत बूथ रचना,बूथ स्तरीय कार्य विजाभान करून बूथ कार्यकर्त्यांवर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे केंद्र सरकार ने केलेल्या कामाबद्दल,विविध योजनेबद्दल पत्रके देण्यात आली.बूथ मधील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्यात आला. प्रत्येक बूथ सशक्त करण्याच्या अनुषंगाने विविध संघट नात्मक रचना बूथ स्तरावर राबविण्यात आल्या.

घर चलो अभियान,संपर्क से समर्थन च्या माध्यमातून बूथ मधील प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन संपर्क करण्यात आला, तसेच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी साहेबांना समर्थन देण्यासाठी 9090902024 नंबर डायल करून मोदीजी यांना समर्थन देण्यात आले.तसेच नवमतदार नोंदणी,लाभार्थी संपर्क,सरल ॲप,बूथ स्तरावरील विविध समित्या,विविध कार्यक्रम प्रमुख असे विविध उपक्रम बूथ स्तरावर राबविण्याच्या दृष्टीने बैठक घेण्यात आली.पक्षाच्या जनसंपर्क अभियानास बूथ स्तरावरून उत्स्पूर्त प्रतिसाद मिळत आहे.सदर अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्षात तालुक्यातील प्रत्येक बूथ स्तरावर जाऊन महाजनसंपर्क यशस्वी करणार असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे यांनी सांगितले.

यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस विनोद पाटील, चंद्रकांत भोलाणे,अनु जाती जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सवळे,गुणवंत पिवटे बूथ प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख,भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)