संत ज्ञानेश्वर नगर (सातव प्लॉट) मधील रहिवाशांच्या घराला लागून असलेले विजेचे तार हटवून केबल टाकण्याची मागणी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


मलकापूर-संत ज्ञानेश्वर नगर (सातव प्लॉट)मधील  विजेचे मेन अल्युमिनियम वीज वाहक तारा येथील रहिवाशी यांचे लागून असलेले विजेचे तार हटवून त्याजागी केबल  टाकण्याची स्थानिक रहिवाशांकडून मागणी करण्यात आली आहे. याबाबत अमोल ज्ञानदेव भीडेकर व इतर रहिवासी संत ज्ञानेश्वर नगर सातव यांनी कनिष्ठ अभियंता वीज वितरण कंपनी विभागीय कार्यालय शिवाजी नगर मलकापूर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की आमच्या भागात व प्लॉट मध्ये विजेचे अल्युमिनियम तारा या घराला लागून गेल्या आहेत. 

सध्या बऱ्याच लोकांचे घरकुलाचे बांधकाम सुरु आहे. पावसाळा त्यामुळे वादळी  पाऊस हवेच्या तीव्र वादळामुळे वीज प्रवाह तारा एकमेकांना आढळून त्यांच्या ठिणग्या पडून जीवित हानी होऊन संकट येऊ शकते व विजेच्या तारा घराला टेकल्यामुळे घरात करंट येतो आणि आमच्या घरामध्ये लहान मुले असल्यामुळे ते इतरत्र खेळत असतात त्यामुळे काही जीवित हानी झाल्यास या जबाबदार वीज वितरण कंपनी कार्यालय मलकापूर जबाबदार राहील त्या विजेच्या बाहेर को तारा त्वरित करण्यात याव्या  ॲल्युमिनियम तारा काढून केबल वायर लावण्यात यावी ही विनंती अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणाला बसू याची प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मागणी संत ज्ञानेश्वर नगर मधील रहिवाशांनी यांनी केली

Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)