मलकापूर अर्बन को ऑप बँकेचा परवाना रद्द

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


गेल्या २१ महिन्यात सहाव्यांदा दि मलकापूर अर्बन को- ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड मलकापूरला सहाव्यांदा वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. सहाव्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत निर्बंधासह होती. त्यापुर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेचे चिफ जनरल मॅनेजर योगेश दयाल यांनी ५ जुलै २०२३ रोजी मलकापूर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मलकापूरचा परवाना रद्द करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. 

    भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अधिपत्याखाली असलेल्या दि मलकापूर अर्बन को - ऑप. बँक लि. मलकापूरची आर्थिक स्थिती ढासळल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आल्याने तसेच करण्यात आलेल्या अंकेक्षण अहवालातील गंभीर बाबींवर आक्षेप घेत व बँकेचा एनपीए प्रचंड प्रमाणात वाढल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी एका आदेशान्वये ६ महिन्यांसाठी निर्बंध जारी केले होते. त्यानंतर ३ महिन्यांची पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती.  तरी सुध्दा बँकेची आर्थिक परिस्थिती आटोक्यात न आल्याने पुन्हा एका वर्षाच्या कालावधीनंतर रिझर्व्ह बँकेने २४ नोव्हेंबर २०२२ रोजी एका आदेशान्वये ३ महिन्यांची म्हणजे फेब्रुवारी २०२३ पर्यंत निर्बंधाची मुदत वाढविण्यात आली होती. तर पुन्हा भारतीय रिझर्व्ह बँकेने २३ फेब्रुवारी २०२३ रोजी पुन्हा २४ मे २०२३ पर्यंत तीन महिन्यांची मुदत वाढ दिली होती. तर आता पुन्हा २४ मे रोजी रिझर्व्ह बँकेने मलकापूर अर्बन बँकेला २१ महिन्यात सहाव्यांदा २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत ३ महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

                                                            नागपूरसह राज्यात २८ शाखा

मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मलकापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर, वर्धा, अकोला, जळगाव, भुसावळ, मेहकर, चिखली, भोकरदन, सिल्लोड, मूर्तिजापूर मिळून एकूण २८ शाखा आहेत. एक हजार कोटींच्या वर ठेवी असलेली ही बँक आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये ग्राहकांचे ‘केवायसी नॉर्म्स’मध्ये गडबड आढळल्यावर बँकेला दोन लाखांचा दंडही ठोठावला होता.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)