धामणगांव बढ़े सादिक शेख
आज दिनांक 31 जुलै 2023 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील पी.एम किसान सन्मान निधी सुरू करा ,अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर कुळे यांनी तहसीलदार यांच्या कडे केली व निवेदन देण्यात आले,या निवेदनात असे नमूद केले आहे की,भारत सरकाने शेतकऱ्यांच्या हितांसाठी पी.एम किसान सन्मान निधी सुरू केला आहे,त्याचा प्रत्येक हफ्ता हा वेळोवेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो,परंतू मोताळा तालुक्यातील सन 2020 पासून नवीन नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या सन्मानाचा निधी अद्याप पर्यंत त्यांच्या खात्यावर वितारील झालेला नाही,आधीच शेतकऱ्यांवर वारंवार नैसर्गिक संकटे येत असताना शेतकऱ्यांच्या हा हक्काचा असलेला निधी सुद्धा आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नाही,म्हणून या विषयावर शासनाने वैयक्तिक लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा अन्यथा मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अक्रोशाचा सामना प्रशासनाला करावा लागेल,असं हे वाक्य या निवेदनात नमूद केले,निवेदन देतांना यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर कुळे, रवी महाजन,अजय चौधरी,गजानन खाडे, संजय गरुडे व आदी मान्यवरां उपस्थित होते
