स्वच्छता दुतांचा सन्मान करून जागतिक फोटोग्राफी दिन साजरा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापूर दि.१९ ऑगस्ट
जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधून मलकापूर तालुका व शहर फोटोग्राफर्स बांधवांच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाची यशस्वी धुरा सांभाळत भारताच्या प्रगतिशील वाटचालीत सदैव दुर्लक्षीत राहिलेल्या स्वच्छता दुतांचा सन्मान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
आज १९ ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त स्थानिक महेश भवन येथे ‘सन्मान स्वच्छता दुतांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये जेष्ठ फोटोग्राफर जगदीश गांधी, केशव गारमोडे, संजय खर्चे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पुजन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता दुतांना शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. 
मागील काळात कोरोना सारख्या भयावह परिस्थितीत वैद्यकीय सेवा बरोबरच स्वच्छता अशा महत्त्वपूर्ण बाबतीत जीवाची पर्वा न करता प्रत्येक ठिकाणी अग्रेसर राहून स्वच्छता कर्मचार्‍यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. शहरातील नाल्या, रस्ते, गटारे, स्वच्छता गृह आदींची स्वच्छता अबाधित ठेवणारे तसेच नागरिकांनी केलेली घाण, कचरा संकोच न करता स्वच्छ करणारे कर्मचारी खर्‍याअर्थाने कर्मचारी नसून ते स्वच्छता दुत आहेत. ते सीमेवर देशरक्षणासाठी लढणार्‍या सैन्यांप्रमाणेच रोगराई, घाण, प्रदुषण, दुर्गंधी यापासून देशवासियांच्या आरोग्याचे रक्षण करतात. परंतु इतके महत्वाचे आणि उपयुक्त काम करणारे स्वछता कर्मचारी सदैव दुर्लक्षीत राहतात.  त्यामुळे जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त स्वकृतीतून स्वच्छतेचा संदेश पसरविणार्‍या ईश्वर जाझोट, प्रविण करोशीया, सागर ढोलकर, विशाल टाक, विशाल बागरे यासह आदी स्वच्छता दूतांचा सन्मान मलकापूर फोटोग्राफर्स बांधवांकडून करण्यात आला.
या आयोजित कार्यक्रमाचे संचालन पंकज देविकार यांनी केले. तर कार्यक्रमासाठी मलकापूर तालुका शहरातील सुरेश चतुर, संजय चवरे, योगेश शर्मा, राजू सुपे, महेश गांधी, आनंद वाघ, दिनेश भागवाणी, विनायक उंबरकार, विनोद चवरे, विशाल भगत, शेषराव भगत, मुकेश सुरपाटणे, मुकेश गारमोडे, अजय ठाकूर, रवि उगले, गोपाल गारमोडे, शुभम पाटील, सादीक भाई, कुणाल वानखेडे, शाम  निर्मल,धम्मपाल सुरडकर, दिपक राऊत, यश ठाकूर, आकाश नायसे, संदीप बावीसआणे, हफीज भाई, संजय कातव, निरज येवतकार, अमित खर्चे, किशोर राऊत यासह आदी फोटोग्राफर्स बांधवांची उपस्थिती होती.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)