धामणगांव बढे सादिक शेख
माझ्या सारख्या शेकडो संघर्षमय तरुणांच्या जीवनातील आदर्श आहात तुम्ही आयुष्यात खूप कमी लोक असे असतात ज्यांचा संघर्ष तसेच जय/ पराजय तुम्ही जवळून अनुभवता त्यातलेच तुम्ही एक, तुमचा संघर्षमय जीवनाचा प्रवास नेहमीच शेकडो तरुणांना प्रेरणा देतो व देत राहील, कित्येक लोकांसाठी तुम्ही रोल मॉडल आहात त्यातलाच मी एक, आज आपल्या नात्याला आठवत नाहीत किती वर्ष झालेत मात्र जेव्हा पासून आपण सोबत आहोत तेव्हा पासून मला कित्येक गोष्टी तुमच्या कडून शिकायला भेटल्यात, सामाजिक जीवन जगत असताना समाजात कस वावरायच याच उत्तम उदाहरण तुम्ही आहात, मला नाही आठवत की एकदा व्यक्ती तुम्हला पहिल्यांदा भेटला असेल आणि तो पुन्हा कदाचित तुम्हला भेटला नसेल, पहिल्या भेटीत लोकांच्या हृदयात आपलं घर कस करायचं हे तुमच्या कडून शिकण्या सारख आहे नक्कीच त्याच अनुकरण आम्ही करत असतो, मी नेहमी म्हणतो की ॲड गणेश सिंग राजपूत एक परिवार आहे पण याला 'ONE FAMILY" बनवण्याचं काम तुम्ही केलय मला आठवत की खूप सारे चढ उतार तुमच्या जीवनात आलेत व अजूनही चालू आहेत मात्र या सर्वात माझा माणूस सुखी आहे ना याची काळजी तुम्ही घेत असता, कधी कधी आम्ही तुम्हला भेटायच/ बोलायचं विसरतो मात्र तुम्ही कधी विसरत नाहीत, काही दिवस ऑफ गेलेत की लगेच तुम्ही कॉल करून आपुलकीने विचारपूस करता कोण करत हो एवढं सगळं ? आपलाच व्यक्ती ना ? बस माणसाला एवढंच हवंय !
आता इच्छा फक्त एकच आहे की आज तुम्ही हजारोंच नेतृत्व करता पुढे लाखोंचं करा फक्त जसे आहात तसेच राहा, कित्येक लोकांच्या अंधारलेल्या जीवनातला प्रकाश तुम्ही आहात हा प्रकाश असाच लखलखत राहो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
बाकी त्या हजारोंच्या गर्दीत ही आम्ही सर्व तुमच्या सोबत असू आणि पाणावलेल्या डोळ्याने अभिमानाने सांगू, गणेश सिंग दादा राजपूत आधार आहे आमचा. पूनच्छ एकदा *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
*सदैव आपलाच - वैभव उघडे पाटील धामणगांव बढे*
