मोताळा तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते धनादेश वितरण

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

धामणगांव बढ़े सादिक शेख

मोताळा तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त तसेच विविध कुटुंबाला भेटी दिल्यानंतर आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी त्यांच्या कुटुंबाला तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने ०१ लक्ष रुपये.धनादेश आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते मृतकाच्या पत्नी गीताबाई सपकाळ यांना तसेच मोताळा तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिनांक- ७ ऑगस्ट २०२३ रोजी सुपूर्द केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत,मोताळा तहसीलदार श्री वैभव पिलारे,ठाणेदार श्री बळीराम गिते, सौं. गौर मॅडम, यांच्यासह शिवसेना युवासेनेचे सर्व पदाधिकारी तसेच मोताळा नगरपंचायतचे सर्व सदस्य आणि विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)