उपकार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन.* *लालमाती सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या धामणगाव बढे परिसरातील विजेचा लपंडाव बंद करा* ..अमर कुळे

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


 धामणगांव बढ़े सादिक शेख

      लालमाती सब स्टेशन अंतर्गत येणा-या गांवत अनेक दिवसा पासुन विजासा लंपडा सुरु असुन या समस्या बाबत  8 ऑगस्ट 2023 रोजी उपकार्यकरी अभियंता मोताळा निवेदन देउन ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी अशी मांडणी करण्यात आली आहे दिलेले निवेदनात म्हटले आहे की, लालमाती सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या धामणगाव बढे परिसरातील सर्वच गावांमध्ये गेल्या महिना भरापासून सतत विजेचा लपंडाव सुरू आहेत,तासभर सुद्धा विद्युत पुरवठा अखंडित पणे सुरू नसतो,अपुऱ्या कर्मचारी संख्येअभावी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी भरपूर वेळ लागतो,परिसरामध्ये धामणगाव बढे हे मोठी बाजार पेठ असलेले गाव आहे.या बाजार पेठेतील उद्योग व्यवसायावर सुद्धा याचा परिणाम होत आहे, या गांभीर्य लक्षात घेऊन योग्य कार्यवाही करावी,अन्यथा आपणास धामणगाव बढे परिसरातील नागरिकांच्या अक्रोशाचा सामना करावा लागेल असं या निवेदनात नमूद केले आहे,निवेदन देतावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर कुळे,श्रीराम सपकाळ, दयाभाई सुरडकर, प्रदिप तायडे व आदी उपस्थित होते,

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)