महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता पीपीटी स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या विषयावर पावर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करून विद्यार्थ्यांसमोर सादर केले. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी केलेला सादरीकरण कौशल्य, वेळ, सामग्री हे तपासण्यात आले. विद्यार्थ्यांना मूल्यांकन करण्याचे कार्य डॉ. मुस्तकीम बागवान, रसायनशास्त्र विभाग व तनवीर खान, वनस्पती शास्त्र यांनी केले.
या पीपीटी स्पर्धेच्या मूल्यांकन मध्ये अल्बिया रागिब शेख हिने (FYBA) प्रथम क्रमांक पटकाविले. तसेच दुसऱ्या क्रमांकवर नेहा शेख हारून, निदा आफरीन मोहम्मद रईस (SYBSC) ह्या विद्यार्थिनी होत्या. तिसऱ्या क्रमांकावर मुबश्शेरा असलम शेख (SYBSC) ही होती.
भूगोल विभागातर्फे या चारही विद्यार्थिनींना सर्टिफिकेट व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. शेख इरफान बशीर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चांद खान, उपप्राचार्य तनवीर खान, डॉक्टर राजेश भामरे, प्राध्यापक पिंजारी सर, डॉ. राजू गवारे, डॉ. अमीन काज़ी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमीन काझी यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन डॉ.शेख इरफान बशीर यांनी केले.
