राष्ट्रवादी काँग्रेसच्या मलकापूर विधानसभेच्या संघटनेत उमेदवारीची मागणी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
मलकापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीसाठी श्री. प्रसाद भाऊ जाधव यांचे नाव पुढे आले आहे. पक्षाच्या मलकापूर शहर कार्याध्यक्ष ॲड. शोएब शेख, तालुकाध्यक्ष बाळू पाटील, आणि शहराध्यक्ष राजू डोफे यांनी जिल्हाध्यक्ष नाझीर काजी यांच्याकडे ही मागणी केली आहे.

प्रसाद भाऊ जाधव यांचे जनसंपर्क, प्रभावी कार्यशैली आणि समाजातील लोकप्रियता यामुळे मलकापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळवून देण्याची क्षमता असल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षात अंतर्गत कलह असल्यामुळे त्यांचा उमेदवार कमजोर ठरू शकतो, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित होऊ शकतो, असे कार्यकर्त्यांचे निरीक्षण आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची मलकापूर विधानसभेची संघटना सध्या अत्यंत मजबूत असून, या भागातील जनतेत पक्षाविषयी विश्वास वाढला आहे. प्रसाद जाधव यांना उमेदवारी मिळाल्यास मतदारसंघात पक्षाच्या विजयाची शक्यता वाढू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तर, उमेदवारीबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर सकारात्मक विचार केला जाईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)