तेव्हा तात्काळ नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी, अशी मागणी बारादारी, दुर्गानगर भागातील रहिवाशांच्या वतीने तहसीलदार मलकापूर यांच्याकडे २१ ऑक्टोबर रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ११ व १२ ऑक्टोबर रोजी मलकापूर शहरासह परिसरामध्ये अतिवृष्टीसदृष्य मुसळधार पाउâस झाला. त्यातच नळगंगा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने मलकापूर शहरातून वाहणार्या नळगंगा नदीपात्राला मोठा पुर आल्याने या पात्राच्या परिसरातील नागेश्वर मंदीर व दुर्गादेवी मंदीर परिसरातील अनेकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे व पावसाचे पाणी शिरल्याने मालमत्तेसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबतचा प्रशासनाच्या सर्व्हे करण्यात आला असतांनाही या भागातील नुकसानग्रस्त हे शासनाच्या सानुग्रह अनुदानापासून वंचित आहेत. तर दुसरीकडे ज्या भागामध्ये अतिशय कमी नुकसान अथवा नुकसानच झाले नाही अशांना प्रशासनाच्या वतीने सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्यात आली. त्यामुळे खरोखर जे नुकसानग्रस्त आहेत त्यांच्यावर एकप्रकारे हे प्रशासनाच्या वतीने अन्यायच करण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे वार्ड क्र.२४ नागेश्वर मंदीर परिसरात असलेल्या सरकारी शौचालयामध्ये पुराचे पाणी शिरल्याने घाण व गाळ साचलेला असल्याने ते आजरोजी बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे सरकारी शौचालय असतांना देखील नागरिकांना याचा काहीही उपयोग होत नाही. तसेच याच परिसरात पुराचे व पावसाच्या पाण्यामुळे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण, कचरा व गाळ साचल्याने नाल्या ह्या चोकअप झालेल्या आहेत. त्यामुळे नाल्यांमधून काही ठिकाणी पाणी हे रस्त्यावरून सुध्दा वाहत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे व यापुर्वीही या परिसरातील पाईपलाईनचा प्रश्न हा गंभीर स्वरूपाचा असून या भागातील असलेली पाईपलाईन ही ४ इंची असल्याने व त्यावर वाढलेले नळांचे कनेक्शन पाहता ती पााईपलाईन ६ इंची करण्यात यावी अशीही मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनावर संतोष बोंबटकार, किशोर राऊत, गोपालसिंह राजपूत, सचिन हांडगे, अर्जून तायडे, शंकरराव पाटील, गजू अहीर, सुरेश ढोले यांचेसह बारादारी, दुर्गानगर भागातील शेकडो महिला व पुरूषांच्या स्वाक्षर्या आहेत.
