मोहनपुरा छोटा बाजार: नळगंगा धरणाच्या विसर्गामुळे आणि अतिवृष्टीमुळे गंभीर हानी ॲड. शोएब शेख (शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार, मलकापूर शहर) यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सादर केले निवेदन

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मोहनपुरा छोटा बाजार या भागात नळगंगा धरणातून पाण्याचा विसर्ग आणि सततच्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी साचून तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून भिंतींना तडे गेले आहेत, छतांवरून पाणी गळत आहे, आणि घरांतील वीजबोर्ड व वायरींग पूर्णतः खराब झाले आहेत. संसारोपयोगी वस्तू आणि इतर साहित्य वाहून गेल्यामुळे कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. धान्यसाठा नष्ट झाल्याने अन्नसंकट निर्माण झाले असून पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. या भीषण परिस्थितीत नागरिक तातडीच्या मदतीची अपेक्षा करीत आहेत.

या संकटात अडकलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. शोएब शेख (शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित पवार, मलकापूर शहर) यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली मोहनपुरा छोटा बाजार येथील रहिवाशांनी एकत्र येत प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

प्रमुख नागरिकांच्या सहभागासह तहसील कार्यालयात जाऊन श्री राहुल तायडे तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आणि निवासी नायब तहसीलदार श्री उगले साहेब, मंडळ अधिकारी व तलाठी यांना या भागात त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले.

निवेदन सादर करताना जावेद जमादार, शेख मुलांची, शेख उस्मान, शेख इमरान, शेख बिस्मिल्ला यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सामाजिक कार्यकर्ते अफसर भाई आणि सफदर भाई यांनी प्रशासनाकडे तातडीने पुनर्वसन आणि मदतकार्य सुरू करण्याची मागणी केली. मजहर जमदार, अफसर मिर्झा, नाझीम भाई, इमरान जमदार आणि बिलाल शेख यांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला.

या निवेदनाद्वारे नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली की, घरांतील संरचनात्मक नुकसान आणि संसारोपयोगी वस्तूंची भरपाई तातडीने करण्यात यावी. ॲड. शोएब शेख यांनी प्रशासनाला कळवले की, वेळीच उपाययोजना न केल्यास येथील परिस्थिती अधिक गंभीर होईल आणि नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागेल.
Tags:

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)