मा. महोदय,
मलकापुर येथे दि.११/१०/२०२४ व दि.१२/१०/२०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टी व नळगंगा धरण विसंर्गामुळे शहराला महापुराचा मोठा तडाखा बसला.
अनेक नागरिकांचे घरात पाणी शिरल्याने घरांची संसाराचे आणि जनजिवनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने पुरग्रस्तांना सानुग्रह निधी देण्याचे आश्वासन दिले असले तरी या निधीचे वितरण कोणतेही सर्वेक्षण न करता मलकापुरातील १५०० व दाताळा येथील ५५१ यात अनेक बनावट लाभार्थ्यांना केवळ नोंदीच्या आधारे वितरण करण्यात आले त्यामुळे अनेक खऱ्या पुरग्रस्तांना ज्यांचे घर पाण्याने पुर्णतः बाधीत झाले आहे, या मदतीपासुन वंचित राहावे लागले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (अजित पवार) यांचे वतीने शहर कार्याध्यक्ष अॅड. शोएब शेख यांनी पुरग्रस्तांसह दि.१५/१०/२०२४ व दि.२१/१०/२०२४ रोजी तहसिलदार मलकापुर व उपविभागीय अधिकारी, मलकापुर यांचेकडे निवेदन सादर केले होते.
तथापी, या निवेदनाची योग्य ती दखल घेतलेली नाही व पुरग्रस्तांसाठी तात्काळ कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे दिसुन येते. ही उदासिनता पुरग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष निर्माण करत आहे.
आम्ही आपल्या माध्यमातुन आग्रहपुर्वक विनंती करतो की, कृपया खऱ्या पुरग्रस्तांचे योग्य पुनरावलोकन करून, त्यांना तातडीने आनुग्रह निधीचा लाभ मिळवुन देण्यासाठी त्वरीत कारवाई करण्यात यावी वास्तविक पुरग्रस्तांचे हाल लक्षात घेता या संदर्भात योग्य निर्णय घेवुन त्यांना दिलासा देण्याची आमची कळकळीची विनंती आहे. दि.०५/११/२०२४, मलकापुर
प्रसाद भाऊ जाधव
बाळुभाऊ पाटील
अॅड. शोएब शेख
राजू भाऊ डोफे
रफिक खान
इमरान शेख
राहुल जाधव
नाजिम शेख
