*पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात जपानी भाषा आणि संस्कृतीवर वेबिनार संपन्न*

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या परकीय भाषा सेलतर्फे ७ नोव्हेंबर २०२४ रोजी "जपानी भाषा आणि संस्कृतीचे रहस्य उलगडा" या विषयावर विशेष वेबिनार आयोजित करण्यात आला. या वेबिनारमध्ये हायटेक जपान आणि मिराई बिझनेस सोल्यूशन्स, जपानमध्ये कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित कॉर्पोरेट प्रशिक्षक श्रीमती नंदिनी तांबोलकर यांनी विद्यार्थ्यांना जपानी भाषा आणि संस्कृतीविषयी मार्गदर्शन केले.

श्रीमती तांबोलकर यांनी विद्यार्थ्यांना जपानी भाषेच्या मूलभूत संकल्पना आणि संवाद कौशल्यांचा परिचय करून दिला. त्यांनी जपानी संस्कृतीचे विविध पैलू उलगडत असताना, जपानमधील कार्यसंस्कृती, शिस्तबद्धता आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचे महत्त्व पटवून दिले. या वेबिनारद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर जपानी भाषेचे महत्त्व आणि त्याद्वारे उभ्या राहणाऱ्या करिअरच्या संधींविषयी माहिती मिळाली.

या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे व प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या परकीय भाषा सेलच्या वतीने आयोजित या वेबिनारचे समन्वयक प्रा. करुणा सिरसाट होते. या वेबिनारमुळे विद्यार्थ्यांना जपानी भाषेच्या आधारे जागतिक पातळीवर संवाद साधण्याची क्षमता मिळाली असून, त्यांच्या करिअरला आंतरराष्ट्रीय स्तरावर दिशा मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी या वेबिनारच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यात देखील अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना विविध भाषा आणि संस्कृतींचा अनुभव देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)