जळगाव (वार्ताहर) इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव संचलित अब्दुल मजीद सालार इकरा उर्दू हायस्कूल बोरनार चे कृतिशील शिक्षक आरीफ खान सर यांना शैक्षणिक व समाज क्षेत्रातील बहुमोल सेवेबद्दल एआयएमएमटीए (ऑल इंडिया मुस्लिम थिंक टैक बंगलोर) प्रोग्रेसिव्ह मायनॉरिटी वेलफेअर सोसायटी (भुसावळ)आणि समर फाऊंडेशन मालेगाव यांच्या वतीने "प्रगतीशील राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष AIMMTA जनरल सेक्रेटरी सी के नायकवाडी होते तसेच कार्यक्रमात प्रा. डॉ. अकील अब्दुल जब्बार (अध्यक्ष RMMS, USA)
हाफिज वली अहमद खान (अहमदाबाद), डॉ.अब्दुल करीम सालार (अध्यक्ष इकरा, जळगाव), डॉ.अशफाक उमर (मालेगाव), डॉ.निलेश चांडक (कर्करोग शल्यचिकित्सक), डॉ.सुनील नेवे (भुसावळ), सलीम सेठ चुडीवाले (भु सावळ) ) आणि शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते. आरिफ खान सर यांनी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुमारे ४१ पुस्तकांची मांडणी, संकलन व संपादन केले आहे, 10वी चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच
CTET, TET परीक्षा मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले.
ईकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी आरिफ खान सरांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
