प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर
मलकापुर :- जि प मराठी उच्च प्राथमिक शाळा घिर्णी शाळेत अवघड समजल्या जाणाऱ्या व महत्त्वाची राज्यस्तरीय डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत वर्ग सहावीचे अकरा विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी पाच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. घिर्णी शाळेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील एन एम एम एस परीक्षा, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे परीक्षा, भारत टॅलेंट सर्च परीक्षा, राज्यस्तरीय आय एम विनर परीक्षा, राज्यस्तरीय इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा, मराठी भाषा ऑलंपियाड परीक्षा, गणित प्रज्ञाशोध अध्यापक मंडळ परीक्षा, एकलव्य ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षा, लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षा, मंथन पब्लिकेशन प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादी परीक्षांना विद्यार्थ्यांना बसून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यात येत आहे. विद्यार्थी परीक्षाभिमुख अभ्यास करून स्वतःच्या व शाळेच्या गुणवत्तेत वाढ करत आहे. ही घिर्णी गाववासियांच्या आणि शाळेच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद बाब आहे. वरील डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल गावातून व परिसरातून सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून विद्यार्थी यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका आणि मार्गदर्शक शिक्षक व आई-वडील यांना देतात.
