मलकापूर - अनुसूचीत जाती-जमाती आयोग अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ना. आनंदारा अडसुळ मलकापूर येथे आज दि. २७/१२/२०२४ आले होते. त्याप्रसंगी त्यांची राज्यमंत्र पदाचा दर्जा मिळाल्यामुळे मलकापूर चर्मकार समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यान आला.
मा. नगरसेवक रविंद्र गव्हाळे व समाजबांधवानी व नागरीकांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. शिवसेना नेते ना. आनंदराव अडसुळ जिल्ह्याचे खासदा राहिले असल्याने त्यांची बुलडाणा जिल्ह्याची नाळ जुडली आहे. त्यांनी मलकापूर चर्मकार इतर समाजासाठी सभागृहासाठी समाजभवन उभे केले व विकासात्मक कामे केले. त्य मलकापूर येथे आगमन झाले असता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा. नगरसेव रविंद्र गव्हाळे, मलकापूर तहसिलदार श्री. राहुल तायडे साहेब, अरुणभाऊ अग्रवाल मा. नगरसेवक पांडुरंग चिम, उपसरपंच मधुकर गव्हाळे, हरिदास गणबस, वसंत शेकोकार स साहेबराव खराटे, शंकर पड्डे, रोहीदास माळी, अमोल हरसुलकर, सागर पढे, संजय पररा किशोर सोनोने, दलित नेते दत्ताभाऊ हिवाळे, पारसमलजी झाबक, महेंद्र बुरड, भाऊसा सरदार, फिरोज खान, संदिप फेंगडे, डॉ. सुभाष तलरेजा यांचे सह समाजबांधव व नाग उपस्थित होते.
