जळगांव: युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मंत्रालय, मुंबई, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यामार्फत *राष्ट्रीय सेवा योजना कार्य गौरव सोहळा 2023-24* चे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्य गौरव सोहळ्यात माननीय नामदार श्रीमती रक्षाताई खडसे केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, प्रोफेसर डॉ. विजय माहेश्वरी, कुलगुरू, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, माननीय डॉ. एस.टी. इंगळे प्र कुलगुरु कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, माननीय डॉ. विनोद पाटील, कुलसचिव, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, माननीय राजेंद्र नन्नावरे, मा. राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, प्रो. डॉ. सचिन नांद्रे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्य गौरव सोहळ्यात इकरा एच. जे. थीम महाविद्यालयाचे तनवीर शेख खलील व उमर शेख बिस्मिल्ला यांचा माननीय नामदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याकडून कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तनवीर शेख खलील यांनी राष्ट्रीय एकात्मता शिबिर, जळगाव तर उमर शेख बिस्मिल्ला यांनी आव्हान शिबिर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली शिबिरात सक्रिय सहभाग घेतला होता.
सदर विद्यार्थ्यांना प्राचार्य चांद खान, कार्यक्रम अधिकारी डॉ. तनवीर खान, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. शेख हाफ़िज़, महिला कार्यक्रमाधिकारी कहकशा अंजुम यांचे मार्गशन लाभले.
डॉ. राजू गवरे, विभागीय समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, जळगाव विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या मार्गदर्शनात सदर विद्यार्थ्यांची निवड झालेली होती.
