मलकापुर (घिर्णी) :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून, विद्यार्थ्यांना एक सराव व्हावा या दृष्टीने धाराशिव यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय परीक्षाचे आयोजन केले होते. या परीक्षेत महाराष्ट्रात 20 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली सर्व पेपर PDF, OMR, PDF ANSWER KEY genius Math Publication यांनी पुरविले अचूक व परीक्षा दृष्टीने परीक्षेचे नियोजन संपूर्ण राज्यात दिसून आले विद्यार्थी सराव व आत्मविश्वास वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा पेपर होता या परीक्षेत जि प मराठी उच्च प्राथमिक शाळा घिर्णी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा परीक्षा समन्वयक श्री सुरेश उतपुरे यांच्या नियंत्रणात 33 विद्यार्थ्यांनी अभिरुप परीक्षा दिली शाळेतील परीक्षेसाठी अध्यापन व मार्गदर्शन श्री सुरेश उतपुरे, श्री सतीश घाटे, व कु भारती खूमकर यांनी केले असून शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री विष्णू बघेले सर यांनी पुढाकार घेऊन ही परीक्षा पार पाडली. या परीक्षा मुळे विद्यार्थी गुणवत्ता वाढीत नक्की फरक पडेल तसेच विद्यार्थी ही परीक्षा धारक होण्यास मदत होईल अभिरूप परीक्षेचे पॅटर्न हे बोर्ड पॅटर्न असून विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा झाला आहे या परीक्षेमुळे जीनियस मॅथ पब्लिकेशनचे शाळेच्या वतीने धन्यवाद देऊन आभार मानले आहे यापुढेही पब्लिकेशन ने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
