दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी वियोगी महाराज जयंती सोहळ्याच्या संपन्न*एक जानेवारी रोजी हजारो भाविकांची उमाळी येथे लागते हजेरी प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 *मलकापूर :-मलकापूर तालुक्यातील उमाळी हे गाव संत वियोगी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे  त्यानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही एक जानेवारीला संत शिरोमणी वियोगी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस *मा.आमदार चैनसुख संचेती* *भाजप प्रदेश उपाध्यक्ष* * यांनी काल्याच्या कीर्तनाला उपस्थित राहून भाविकांना संबोधित केले. त्यांनी वियोगी महाराजांच्या विचारांची आठवण करून दिली आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमादरम्यान, *इंजी. कोमलताई सचिन तायडे,* संस्थापक अध्यक्ष, जनक्रांती फाऊंडेशन आणि जिल्हा उपाध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड यांच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन माननीय आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते करण्यात आले.
हा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नव्या वर्षाच्या प्रारंभी अशा आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे भाविकांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा संचारली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)