इस्लाममध्ये सेवा म्हणजे इतरांना मदत करणे आणि मानवतेच्या भल्यासाठी कार्य करणेहदीस, कुराण आणि सुन्नातचा प्रसार करणे हा जमियत चा उद्देश मिन्हाज खान

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
*"जमियत अहल-ए-हदीस हे कुराण आणि सुन्नाच्या योग्य संदर्भांसह प्रचाराचे केंद्र आहे. तौहीद (अल्लाहची एकता) कडे आवाहन करणे आणि साहबाच्या योग्य कार्यप्रणालीवर आणि इस्लामला समजून घेण्यासाठी उलमा ला विकसित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. जमियत अहेल हदीस चळवळीचा इतिहास इस्लामी दावत चळवळीइतकाच जुना आहे." मिन्हाज खान*

बुलडाणा (प्रतिनिधी)
शहरातील गवळीपूरा येतील मोहम्मदी मस्जिद मध्ये अनेक वर्षांपासून लहान मुलांसाठी सकाळी आणि संध्याकाळी मकतब अरबी मदरसा त्यात लहान मुलांना कुराण आणि हदीसचा शिक्षण देण्यात येते. मोहम्मदी मकतब च्या विद्यार्थीच्या वार्षिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात 50 मुलांनी सहभाग घेतला त्या पैकी प्रथम क्रमांक आमेना मिर्झा नसीम बेग इस्लामीक भाषण द्वितीय आबेदा सैय्यद नसीम यांनी हमद (नझम) तृतीय आलेल्या सैय्यद साद यांची किरात तसेच त्यांच्या वर्गात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्यांना प्रमुख पाहुणे च्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
    या वार्षिक मेळाव्याला संबोधित करताना जमीयत अहले हदीस चे मिन्हाज खान म्हणाले की, आज मुस्लिमांच्या समस्यांचे कारण म्हणजे ते धर्माने सांगितलेल्या मार्गापासून दूर गेले आहेत. ऐहिक चाकोरीमुळे तो कुराण आणि इस्लामने दाखवलेल्या मार्गापासून दूर जात आहे. मदरसा मधील शिक्षणाच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आता मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणासोबतच दुनिया सांसारीक शिक्षणही दिले जात आहे.  त्यामुळे मदरशातील मुले धर्माच्या बाबतीत जगातील सर्वच बाबतीत प्रगती करत आहेत. त्यांनी उपस्थित जनतेला कोणत्याही परिस्थितीत मुलांना शिक्षण देण्याचे आवाहन त्यांनी केले. इस्लामीक गाइड्स सेंटर चे सुप्रसिद्ध समाज सेवक उमेर देशमुख म्हणाले की इस्लाममध्ये, कुटुंब आपल्या सदस्यांना योग्य शिक्षण आणि नैतिक शिक्षण प्रदान करण्यात मोठी भूमिका बजावते. मोहम्मदी मकतब चे मुख्य शिक्षक मो. झोएब म्हणाले की मुलांचे मन खूप हळुवार असते, त्यांना बरोबर-अयोग्य समजत नाही, ते त्यांच्या आजूबाजू च्या वातावरणात किंवा त्यांच्या मित्रांसारखे शाळेत काय पाहतात किंवा मदरश्या च्या वातावरणाचा मुलांच्या मनावर आणि मेंदूवर चटकन परिणाम होतो. या वेळी शेख रहीम बाबू, झिया मोहम्मदी, शेख अहमद, बबलू कुरेशी, नसीर बॅग, नसीर भाई, मोहसीन कुरेशी,मो जुहैब भाई मो नदीम,अब्दुल रहमान, हुजैफा,इम्रान मिर्झा, वसीम कुरेशी मो मुशीर, उमेर कुरेशी, कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमीयत अहले हदीस परिश्रम घेतले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)