पिंपळगाव राजा येथील बुलढाणा अर्बन चरिटेबल सोसायटी, सहकार विद्या मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे सण 24 - 25 साठी इंद्रधन वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे...
या स्नेहसंमेलन करिता उद्घाटन प्रसंगी डॉ. सुकेजी झमवर मॅनेजिंग डायरेक्टर कोमल झमवर चेअर पर्सन मुकेश गुजर एपीआय पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा जीबी पवार जिल्हा परिषद केंद्र पिंपळगाव राजा हे उपस्थित होते आणि स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी स्टेट बँक ऑफ इंडिया पिंपळगाव राजा मॅनेजर शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत निकम सर उपमुख्याध्यापक सोयास्कर सर पत्रकार राहुल मुंढे व इतर पत्रकार यांची उपस्थिती होती.
या सहकार विद्या मंदिर पिंपळगाव राजा येथील इंद्रधनुष वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दिनांक 16 जानेवारी आणि 17 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या संमेलना करिता आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे स्वागत हे स्वागत गीत गाऊन केले.
या वार्षिक स्नेहसंमेलन करिता विद्यार्थ्यांच्या पालकांसोबतच शाळेतील शिक्षकांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. या स्नेहसंमेलनाकरिता शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला तसेच काही विद्यार्थ्यांनी तर मलखांब चे प्रात्याक्षिक देखील करून दाखविले. बाल चमू ने आपले कला सादर करून आपल्या पाल्यांना तसेच शिक्षकांना देखील मंत्रमुग्ध करून ठेवले. सर्व शिक्षक वृंद यांनी अतिशय परिश्रम घेऊन खूप चांगले असे परफॉर्मन्स झाले.
या वार्षिक स्नेहसंमेलनाकरिता सहकार विद्या मंदिर येथील सर्वच शिक्षक तसेच शिक्षिका यांचा विद्यार्थ्यांच्या कलांना वाव देण्याकरिता सिंहाचा वाटा आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या कलांना वाव मिळण्याकरिता शाळेचे विद्या मंदिराचे प्रिन्सिपल श्री निकम सर यांनी विद्यार्थ्यांचे तसेच सर्व शिक्षक वृंदांचे देखील कौतुक केले.
तसेच विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना खुलासा मिळण्याकरिता या स्नेहसंमेलनाचे आयोजन करीत असल्याचे मुख्याध्यापक श्री निकम सर यांनी सांगितले.
हा स्नेहसंमेलनाचा सोहळा पाहण्याकरिता प्रमुख पाहुणे पालक आणि कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले सर्व मान्यवर जेव्हा आम्हा शिक्षक शिक्षकांचे मुलांचे कौतुक करतात तेव्हा या सोहळ्या दरम्यान सर्वांनी घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले असे निकम सरांनी व्यक्त केले.
या स्नेहसंमेलन सोहल्यकरिता सर्व शिक्षक वृंद यांचे महत्वाचे योगदान आहे.
या वार्षिक इंद्रधनु स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन अनिता ढगे सुनीता दाते मंदाकिनी बोराडे आरती राठोड यांनी के
*राहुल पाटील मुंढे*
*खामगाव*
9423760528
