उपक्रमशील शिक्षकांचा विनोबा ॲप मधील उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
मलकापुर :- जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲप च्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहन पर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 

डिसेंबर महिन्यातील जिल्हा स्तरावरील 'पोस्ट ऑफ द मंथ' सुनिता सैंदाणे, सुरेश सैंदाणे, मंजुषा कुलकर्णी, संगीता सनप आणि गणेश राऊत सर तसेच महावाचन विजेते रंजना सोनवणे आणि सुरेश उतपुरे 
 सर घिर्णी तसेच उपक्रमशील कार्य करत असलेले केंद्र हिवरखेड, जनुना, किनोळा, खेरडा, सोनाळा आणि शेंबा बुद्रुक 
सोबतच जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा डायट व शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ज्या शाळेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेला आहे अशा शाळा यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात सर , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन सर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड सर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार सर, शिक्षणाधिकारी  खरात सर , शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल आकाळ सर, योजना शिक्षणाधिकारी वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर सर, उपशिक्षणाधिकारी उमेश जैन सर , डायट प्रिन्सिपल भटकर सर तसेच इतर डायट अधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे शिक्षकांना आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाला सदरील पुरस्कार देताना जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व केंद्रप्रमुख सर सोबतच विस्तार अधिकारी  तथा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमाचे कार्यक्रम समन्वयक वानखेडे सर , जिल्हा समन्वयक नजीर शेख ,अजय राठोड उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)