मलकापूर येथे माता रमाई यांची जयंती साजरी... स्थानिक रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथे माता रमाई यांची १२७वी जयंती साजरी करण्यात आली

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष अजय सावळे तर प्रमुख उपस्थित मध्ये मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप काळे उपस्थित होते.
      यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते माता रमाईंना  अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या त्यागाची महती सांगण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना अजय सावळे यांनी रमाईंच्या त्यागा विषयी माहिती दिली. तर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित संदीप काळे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात  माता रमाईंच्या त्याग ,समर्पण, समाजासाठी असलेली तळमळ या सर्व बाबींचा आपल्या भाषणातून उल्लेख केला आणि समाजातील स्त्रियांनी सुद्धा माता रमाईंचा आदर्श घेऊन आपल्या संसार करावा असे त्यांनी आपल्या भाषणातून भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित असलेले भाऊसाहेब सरदार,  भाऊराव उमाळे ,सुशील भाऊ मोरे, दीपक चांभारे पाटील,  प्रतापराव बिराडे, विजय बिराडे, सम्राट उमाळे, सदाशिवराव विखारे साहेबसंजय वानखेडे, बबनराव तायडे निलेश वाघ, निलेश इंगळे, रेल्वे अधिकारी यशवंतराव गवई, प्राध्यापक धीरज वाकोडे ,प्राध्यापक राजीव गवई, सदाशिवराव ई खारे साहेब, निरीक्षक यांचे प्रतिनिधी माने साहेब, ठाकूर काका, वानखडे सर, सुनील इंगळे उपस्थित होते. 
   तर पत्रकार बांधवांतर्फे नथूजी हिवराळे, पंकज मोरे, यासीन कुरेशी उपस्थित होते. 
     या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भीमरावजी नितोने आणि अजबराव वाघ यांनी केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)