पुणे – पिपळे गुरव शहरातील प्रतिष्ठित बाठे कुटुंबातील इशिका श्रीनिका यांचा बोरन्हाण सोहळा पारंपरिक पद्धतीने गुरुवार दि ३० जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा आनंदसोहळा साजरा करण्यात आला.लहानग्या श्रीनिका व इशिकावर बोर, मिठाई, फुले आणि गोड पदार्थांची उधळण करत तिला शुभेच्छा देण्यात आल्या.
या सोहळ्यात महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पल्लवी अश्र्विन बाठे आणि ललिता बाठे या सासू-सुनेनी हा कार्यक्रम संयुक्तपणे पार पडला. महिलांना हळदी-कुंकू लावून सौभाग्यवतींच्या हस्ते तुळशीची रोपे भेट देण्यात आली. पर्यावरणपूरक संदेश देणारा हा उपक्रम उपस्थित महिलांना अतिशय आवडला. तुळशीच्या रोपामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही अधोरेखित झाले.
कार्यक्रमात विविध पारंपरिक खेळ, गाणी आणि मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. उपस्थितांनी लहानग्या इशिकाला शुभेच्छा देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले. बोरन्हाण सोहळ्याच्या निमित्ताने कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र आल्याने सगळ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या सुंदर आणि संस्मरणीय सोहळ्यामुळे घरच्यांसाठी एक अविस्मरणीय दिवस ठरला. संस्कृती आणि परंपरा जोपासत हळदी-कुंकू आणि तुळशी रोप भेटीचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याबद्दल पल्लवी महेश जगताप
स्वयंरोजगार व महिला प्रशिक्षण संस्था,
सुरेखा मोहिते,ऋतुजा पेढेकर,तृप्ती जवळकर(समाजसेविका), स्वाती जवळकर,विद्या पवार,जयश्री घोगरे,यासह मयूर नगरी सोसायटी यातील महिलांचा सहभाग होता.उपस्थितांनी कुटुंबीयांचे भरभरून कौतुक केले.
