*एमआयडीसी ठाणेदार यांचे विरुद्ध लाचलुचपत कारवाई पासून वाचवण्याबाबत आहे कथन.*
या बाबत सविस्तर असे की रमेशराव बाबुसिंग राजपूत रा. हरी किसान सोसायटी मलकापूर यांच्या कथित नावाने पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना लेखी पत्राद्वारे कळविले की "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्याशी नरवेल भागातील रेती व्यावसायिकांनी संपर्क साधला. २५ ते ३० रेती व्यावसायीकांसह पाटील यांनी चेतन्यवाडी येथील बिल्डिंगमध्ये गुप्त बैठक घेतली आहे. या बैठकित ठाणेदार कोळी यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळुन लाचलुचपत विभागाची कारवाई करण्याबाबत निश्चय केला. त्यांची सर्व वसुली ही अमन हॉटेल येथे जमा होते, त्यांच्या अधिनिस्त एका पोलीस कर्मचाऱ्यानी एका प्रकरणामध्ये चक्क ऑनलाईन ट्रांजेक्शन द्वारे लाच स्वीकारलेली आहे. ठाणेदार यांच्या त्रासाला कंटाळून एक रेती व्यावसायिकाने त्यांना टिप्पर द्वारे उडून टाका असे बैठकीत नमूद केले. दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील एक निलंबित पोलीस कर्मचारी हा त्यांचा हस्तक आहे. अशा प्रकारचे आरोप असून तालुका प्रमुख दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हेमराज कोळी यांना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकवण्याबाबत संपूर्ण षडयंत्र तयार झालेले आहे. तरी आपण हेमराज कोळी यांच्यावर वचक बसवावा व त्यांना कुठल्याही प्रकारची लाच न घेण्याबाबत प्ररावृत्त करावे व त्यांची नोकरी साबूत ठेवावी" असे अर्जादाराने नमूद केलेले आहे."
एकंदरीत सदर पत्रात दिपक पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून ठाणेदार हेमराज कोळी यांच्या बदली करण्याचा उद्देश असावा असे मुलाखतीतून समजून येते.
चौकट
"सदर पत्राबाबत मला माहिती मिळाली असून तक्रारदार व माझा कसलाही परिचय नाही नमूद केलेली कुठल्याही प्रकारची बैठक झालेली नसून ठाणेदार हेमराज कोळी यांच्याबाबत माझ्याकडे आज पर्यंत कुठल्याही प्रकारची कोणीही तक्रार दिलेली नाही. तरी जिल्ह्यात कुठल्याही शासकीय विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी आपल्याला स्वतःच्या हक्काच्या कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास आपण माझ्याशी संपर्क साधावा व आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असे या दरम्यान दिपक चांभारे पाटील यांनी सांगितले.
