मलकापुर:- तालुक्यातील नरवेल येथील आरोग्य उपकेंद्रात सुरक्षा गार्ड, आरोग्य सेविका( एन एम),ओ.पी.डी.एन.एम ची मागणी शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत व शहर प्रमुख गजानन ठोसर यांनी एका निवेदनाद्वारे तालुका आरोग्य अधिकारी डॉ .सुरेखा जैन यांच्याकडे केली आहे .निवेदनात नमूद केले आहे की नरवेल येथील आरोग्य केंद्रात टवाळखोर मुलांचा व दारुड्यांचा महिला कर्मचाऱ्यांना त्रास असून या ठिकाणी तात्काळ सुरक्षा गार्डची नियुक्ती करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे तसेच आरोग्य उपकेंद्राची जुनी इमारत मोकळी झाली असून त्यामध्ये दारुडे यांचा उपद्रव्य यांचा उपद्रव वाढला असल्याने ती जुनी इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे
