हवामान अपडेट राज्यावर अस्मानी संकट ४ जिल्ह्यात गारपिटीचा इशारा ९ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
*मुंबई-* महाराष्ट्रावर दुहेरी संकट आलं आहे. मुंबई ते रायगड, कोकण पट्ट्यात दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे. तर दुसरीकडे गारपिट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 4 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिट, तर 9 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना इथे पावसाच्या हलक्या सरी बरसतील. परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये 21 मार्च म्हणजेच आज गारपिटसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 40-50 किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहतील. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. 

22 आणि 23 मार्च रोजी देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता, तरी उन्हाचा चटका मात्र कायमच राहणार आहे. लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. रेणापूर तालुक्यात बरसलेल्या पावसामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वाशिम जिल्ह्यात नाफेडने सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी केलीय. मात्र शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळाला नाहीये. तांत्रिक कारण पुढे करून नाफेडकडून पैसे अडवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)