अडावद लोकनियुक्त सरपंच व ग्रामविकास अधिकार्‍याचा मनमानी कारभार

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

अडावद ता.चोतडा (प्रतिनिधी)

अडावद ता.चोपडा ग्राम पंचायतचे लोक नियुक्त सरपंच व ग्रामविकास अधिकारी मनमानी कारभार चालवत असून ग्रा.पं.सदस्यांना उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. तेव्हा चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ग्रा.पं.सदस्यांनी गट विकास अधिकारी पं.स.चोपडा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, मौजे अडावद ग्रामपंचायत अडावद ता.चोपडा जि.जळगाव मध्ये लोक नियुक्त सरपंच व ग्रामविकास अधिकारी हे दोघे जन ग्रा.पं.सदस्या व सदस्य यांना विश्वासात न घेता परस्पर काम करीत आहेत. कोणत्याही प्रकारचे कामाचे बिल मासिक मिटिंगमध्ये चर्चा न करता परस्पर ऑनलाईन दिले जात आहे. त्या बाबत विचारणा केली असता ग्रा.पं.सदस्या व सदस्य यांना उडवा उडवी चे उत्तर ते देतात. तसेच मासिक सभा दि.२४/०१/२०२५ च्या मिटींगला कामाचे बिल अदा न करायचे ग्रा.प. सदस्या व सदस्य यांनी सांगितले असता ते बिलाची रक्कम त्यांनी अदा केली आहे. गावामध्ये कॉक्रीटीकरण रोड व पेव्हर ब्लॉक आणि गटारीचे काम हे खराब केलेले आहेत. त्या खराब केलेल्या कामाचे बिल अदा करायचे नाही असे ग्रा.पं. सदस्या व सदस्य यांनी सांगितले असता ते बिल सुध्दा त्यांनी परस्पर ऑनलाईन अदा केले. तेव्हा त्या सर्व कामांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर रविंद्र लक्ष्मण चव्हाण, संदिप कैलास महाजन, कमलाबाई राजु खजुरे, रेखाबाई मंगेशराव पारधी, जुनेद खान मुनसफ खान पठाण, शाहरुख हैदर तडवी, बानोबी शे. रशीद मन्यार, शकीलाबी मुनसफ खान पठाण आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)